नवीन नाटक “निर्मलग्राम”..

पी.डी.ए सादर करीत आहे ” निर्मलग्राम “

दिनांक २९ मार्च रात्रौ ९ वाजता भरत नाट्य मंदिर येथे 

        या नाटका विषयी थोडेसे… 

“निर्मलग्राम”

 

“निर्मलग्राम योजनेअंतर्गत मंजूर झालेले संडास ज्या गावात अजून बांधले गेले नाहीत, त्या गावातल्या निवासी शिक्षकांनी ते बांधून घ्यावेत” असा सरकारी आदेश काही वर्षांपूर्वी निघाला होता..

अशाच एका गावात, नव्यानेच शिक्षिका म्हणून भरती झालेल्या कुलकर्णी बाईंना या आदेशामुळे बराच त्रास सहन करावा लागतो.. गावातल्या सरपंच आदी मंडळींना गावात स्वच्छताग्रुह बांधणं कसं गरजेचं आहे हे पटवून द्यायला जातात.. पण काहीही न करण्याची सवय लागलेल्या राजकारणी मंडळींचा हे काम करण्यातला उत्साह कमालीचा असतो तो त्यात मिळणा-या अनुदानामुळे आणि बक्षिसाच्या रकमेमुळे.. ते सरकारी आदेशाचा आधार घेऊन नकळतपणे संडास बांधायची सर्व जबाबदारी बाईंवर सोपवतात.. एका अर्थाने त्यांना त्यात अडकवतात..

शाळेचे वर्ग आणि संडासाचं बांधकाम एकत्र करणं शक्य नाही हे बाईंचं बोलणं कोणीच मनावर घेत नाही.. बाई प्रतिकाराचा प्रयत्न करतात तेंव्हा गोड बोलून, प्रसंगी धमकावून त्यांना संडास बांधून घेण्यासाठी मजबूर केलं जातं.. शिक्षकांना जास्तीची शिक्षकेतर कामं करण्यासाठी सरकार कडूनच दबाब येत असल्यामुळे आपली कैफियत कोणापुढे मांडावी हे बाईंना कळेनासं होतं. ज्यांच्यासाठी त्या लढत आहेत त्यांचीही साथ मिळंत नाही म्हंटल्यावर बाई हतबल होतात आणि स्वत:च संडास बांधायला घेतात…!!

 

Image

 

   निर्मलग्राम या नाटकाविषयी बोलताना या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक केदार म्हणाला,

“आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात ज्या बघून आपल्याला हे काय चाललय..! असा प्रश्न

पडल्याशिवाय राहत नाही…असाच मला पडलेला एक प्रश्न…शिक्षकांच्या बाबतीतला…मध्यंतरी वर्तमान पत्रात एक बातमी होती..ती वाचून आपल्या सरकारच्या दृष्टीकोनाची गम्मत वाटली..शिक्षकी पेशाच काही एक पावित्र्य होत कोणे  एके काळी…हो कोणे एके काळी असाच दुर्दैवाने म्हणावा लागेल..कारण शिक्षक हा सुद्धा एक सरकारी नोकर आहे या भूमिकेतून सरकार कडून त्यांची प्रचंड गळचेपी होते …शिक्षणेतर अशा अनेक कामांमध्ये केवळ एक सरकारी नोकर या नात्याने त्यांना अक्षरशः जुंपले जाते …म्हणजे सामाजिक भान ज्याचे त्याला असतेच…पण सरकारतर्फे ते लादले जाणे हा एक हास्यास्पद प्रकार आहे..अश्या काही घटनांमध्ये “अति झाल आणि हसू आल..” अशी गत होते..त्यात असलेली विसंगती अशावेळी अनेक पटीने मोठी होऊन दिसायला लागते …ती अशीच मला एका GR मध्ये दिसली..त्यावर माझ प्रामाणिक मत व्यक्त करणे गरजेचे वाटले म्हणून हा नाटक-प्रपंच.. “

      तेव्हा  या नाटकाचा प्रयोग पाहायला नक्की या.. २९ मार्च रात्रौ ९ वाजता… भरत नाट्य मंदिर येथे…

 

 

 

 

 

Advertisements
Posted in प्रवर्ग नसलेले

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s