पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

मे महिन्यासोबत सुट्ट्या, मौज-मजा, आंबे आणि त्याचसोबत न चुकता येतं ते पीडीएचं नाट्य प्रशिक्षण शिबिर. प्रथम भालबा केळकरांनी सुरू केलेलं हे शिबिर पीडीएमधक्याच कलाकारांकरता असे. नंतर घुलेकाकांच्या कारकिर्दीत मेघना वैद्य, दिलीप वेंगुर्लेकर, दीनानाथ टाकळ्कर आणि पाठक सर अश्या काहीजणांनी मिळून हे शिबिर खुलं करायचं ठरवलं आणि मग १९९२ पासून हे शिबिर सर्वांसाठी खुलं झालं. पण खुलं म्हणजे काही महत्वाच्या अटींवरच या शिबिरामधे प्रवेश दिला जाऊ लागला. दर्जा राखण्यासाठी अर्थातच मर्यादित प्रवेश ठेवावा लागणं आलंच आणि त्यासाठी इच्छुकांमधून मुलाखतीद्वारे २५ ते ३०च शिबिरार्थी निवडले जाऊ लागले.

प्रतिवर्षी येणारे अनुभव जमेस धरून शिबिरात योग्य ते बदल करत जात आज या शिबिराचा मूळ हेतू हा असतो की नाटक ज्या कोणाला मनापासून करावसं वाटतं, त्यातल्या खरंच उत्कट इच्छार्थींना नाटक या प्रकाराची परिभाषा, नाटकाबद्दल सर्व माहिती, नाटकातल्या कोणाकडूनही अपेक्षित असते शिस्त, नाटकाचं तर्कशास्त्र, नाटक आणि जीवन यांचा संबंध, चित्रपट / मालिका आणि नाटकामधले फरक, अभिनय, तंत्र आणि संहिता ते प्रयोग हा प्रवास अशी सर्व संकल्पना स्पष्ट करण्याचा हेतू मनात ठेवून शिबिराची आखणी केली जाते आणि संचालनही तसंच शिस्तबद्ध पण आनंद कधीही कणभरही कमी न होऊ देणार असतं.

या वर्षीचं पीडीए शिबिर तीन दिवसांनी वाढवलं आहे. समारोपाचा कार्यक्रम ५ जून रोजी सायंकाळी आहे, त्यामुळे ११ मे २०११ ते ४ जून २०११ असा शिबिरातील प्रशिक्षणाचा कालावधी आहे. या कालावधीत रोज सायंकाळी ठीक पांच ते रात्रौ ९.३० अशी शिबिराची वेळ आहे.

एकही दिवस उशिरा न येणं आणि एकही दिवस शिबिराला दांडी मारणं या शिबिरात करता येत नाही. उशिरा येणं किंवा न येणं या घाणेरड्या सवयीतून २२-२३ दिवस नक्की सुटका हवी असेल त्यांना किंवा तशी सवय मुळातच असलेल्यांना हे जड जात नाही .. पण महत्वाचं हे, की नाटक खरंच उत्कटतेने करायचं असेल अशाच शिबिरार्थीला हे करण्यात काहीही अडचण वाटत नाही हे नक्की. नाटकात यायचं असेल तर स्वत:पेक्षा स्वत:च्या कामाला मोठं मानता येणं फार मह्त्वाचं आहे असा हा नाटकाचा पहिला धडा शिबिरार्थी रोज गिरवतात.

या शिवाय शिबिरात आज काय काय घडलं ते स्वत:च्या दृष्टिकोणातून लिहिण्यासाठी एक वही दिली जाते. हे वही संपवली तर दुसरी .. तिसरी .. कितीही वह्या घ्या पण संपूर्ण वृत्तांत लिहा असा आग्रह असतो. हे लेखन शक्यतोवर मराठीतच करायचं असतं. अनेक शिबिरार्थी ही वही कसलातरी महत्वाचा वारसा वगैरे असल्याप्रमाणे जपून ठेवतात.

असो. शिबिरात येण्याचे फायदे शिबिरार्थीच तुम्हाला सांगतील. पीडीएचं शिबिर मला करायचंय . .. कोणी केलंय का .. काय मत आहे .. करू का ? असे प्रश्न फेसबुकात फक्त विचारून पाहा …

Advertisements

3 thoughts on “पीडीए चं नाट्य-शिबिर २०११ !

 1. मी केलंय हे शिबीर ! ! !
  १९९५ साली..पण शिबिरातले दिवस आठवले की वाटतच नाही की १६ वर्षे सरली म्हणून..असं वाटतं की फक्त सोळा क्षण उलटलेत…
  पी.डि.ए चं शिबीर ..
  त्यावेळी सेनापती बापट रोडजवळ “कलाछाया” मध्ये व्हायचं.आता कुठे होतं माहीत नाही.
  किती शिस्तबद्ध ..पण ती शिस्त कधीही बोजा वाटली नाही.उलट स्वतःला सवयच लागली काटेकोरपणाची .आणि नुसती शिस्त नाही बरंका …तिथं अनुभवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला काही शिकवणारा .खूप खूप आनंद देणारा,समाधान देणारा.आणि मोहित,प्रदीप,प्रसन्न दादा ,रुपाली,स्वप्नाली मेघना ताई,दिलीप काका ..आणि असे इतर कितीतरी छान छान मित्र जोडून देणारा.
  शिबिरातल्या थीएटर गेम्स ,ती व्याख्यानं आणि ते उत्स्फूर्त नाट्याविष्कार ..यांची मजा काही औरच !!! ती स्वतःच अनुभवायला हवी ! !मी ती अनुभावलीये…तुम्हीही अनुभवून पहा.
  त्या शिबिराचे २२ दिवस म्हणजे मी मिळवलेली आयुष्यभराची शिदोरी ..सर्वात मौल्यवान .सॉरी ..अमूल्य ..कधीही न संपणारी..निराशेच्या क्षणांमध्ये आशा जागवणारी. .एकटेपणात आधार देणारी..
  तुम्हाला जर मनापासून थीएटर करायचं असेल तर पी.डि.ए च्या शिबिरासारखी दुसरी चांगली सुरवात असूच शकत नाही.
  (हं ; मात्र नाटक म्हणजे टाईमपास किंवा रिकामटेकड्या लोकांचे उद्योग अशी कल्पना असणाऱ्यांनी या वाटेला न जाणेच उत्तम.)
  मला जर शक्य झाले तर मी पुन्हा शिबिरार्थी होईन ..परत ते आनंदपर्व अनुभवण्यासाठी.. किंवा देवाने जर वर मागायला सांगीतला तर मी मागेन …
  हे देवा , द्यायचेच असेल तर मला १५-मे-१९९५ ते ८-जून-१९९५ चे दिवस पुन्हा अनुभवावयास दे .. कारण , हे माझ्या पी.डि.ए च्या शिबिराचे दिवस आहेत…

  कौस्तुभ पोंक्षे
  ९३२५५०९२८३

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s