झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून !

झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून !
आनंद चाबुकस्वार या आमच्या मित्राच्या डोक्यातली ही कल्पना .. मुळात हीच कल्पना .. की झाडं ह्या मातीच्या मनातून उमटणार्‍या कविताच .. हीच फार मस्त आहे.
आनंद चाबुकस्वार, रुपाली भावे, अनुपम बर्वे, अश्विनी गिरी आणि प्रदीप वैद्य हे पांच जण मंदार कुलकर्णी, वरुण वेंकिट आणि प्रणव परळीकर यांच्या मदतीने हा कार्यक्रम करीत असत. टॅक्ट – TACT  (टेंपररी अ‍ॅंड कंटेंपररी थियटर) या नावाने एक वेगळीच व्यवस्था या सगळ्यांनी मिळून केली होती.
मराठीत झाडांविषयक हज्जारो कविता आहेत. गेल्या शंभर वर्षांमधील अश्या हज्जारो  कवितांमधून आनंद चाबुकस्वार ने ५१ कविता निवडून या कार्यक्रमाची संहिता तयार केली आहे. झाडे आणि आपण यांच्यातल्या परस्पर नात्या-गोत्यांचा हा एक धांडोळाच म्हणता येईल ..
सध्या पीडीएचे कलाकार या कार्यक्रमाच्या नवीन आवृत्तीची तालीम करत आहेत.
साधारण त्याच सूत्राप्रमाणे पण आपले वेगळेपण जपत आम्ही हा कार्यक्रम पुन्हा रचत आहोत.
४ ऑक्टोबर ला याची रंगीत तालीम असून .. त्यानंतर काही कलाकारांच्या परीक्षा असल्यामुळे या कार्यक्रमाच्या नवीन अवताराचा पहिला प्रयोग असेल ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात !
याबद्दल अधिक माहिती इथे देत राहूच …
Advertisements

3 thoughts on “झाडे – मातीच्या मनातील कविता : पुन्हा एकदा पीडीए कडून !

 1. ५१ कविता … झाडांवर .. !!!
  या प्रवासात ५१ झाडे भेटतील की .. ५१ वेगवेगली पाने असलेले एकच झाड ? ..
  तिथे रुतु असतील ? .. पाउलवाट असेल ? ..
  गवताच्या पानावर सम्भालुन बसलेला दवबिंदू असेल .. की एखादे स्वच्छंद पाखरु ? .. रविकिरनाच्या गप्पा असतील की हलुवार वारयाची झुलुक ?
  झाडाच्या मनातले गुपित असेल की हुरहुर लावनारया आठवनी ? ….
  काय असेल ? कोण भेटेल ? ..
  …मी वाट पाहतोय ..
  — $ सच $–

  1. सचिन,

   सगळीच झाडं ह्या ५१ कवितांच्या निमित्ताने मनात जागी होतील .. जिवंत होतील ! आणि मग यथावकाश बहरूही लागतील .. अर्थात आपण त्यांना वाढू दिलं तर !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s