दौर्‍याची सांगता .. बातमीपत्र – ६

१८ तारखेला म्हणजे काल जयपूरात झालेल्या सख्खे शेजारी च्या सहाव्या प्रयोगाने दौर्‍याची सांगता झाली.
त्याआधी कोट्याच्या प्रयोगानंतर आत्मविश्वास वाढलेला संघ जयपूर मार्गेच अजमेरला आला. अजमेर ला व्यवस्था चांगली होतीच पण यावर्षी कोट्याच्या व्यवस्थेतही फारच वाढीव आस्था आणि सुखसोयींचा अंतर्भाव झाला असल्याने आणि प्रयोगही तसा बर्‍यापैकी झाल्याने पॉझिटिव्ह स्पिरिट मधे होते सगळेच.
अजमेरला दर्ग्यात जाऊन येण्याची ओढ प्रत्येकालाच होती. गेल्या दोन दौर्‍यांनाही जे आले होते त्यांनाही ही ओढ होतीच. तिथे जाऊन येणं मात्र खरंच एक अवर्णनीय अनुभव असतो. तो तसाच यावर्षीही आला.
रात्री प्रयोग बरा झाला. म्हणजे पहिला अंक फार चांगला आणि दुसरा अंक ओढला-ताणला गेलेला वाटावा असा झाला. मग जयपूरची ओढ लागली. तो शेवटचा प्रयोग होता त्यामुळे आता तो मस्तच व्हायला हवा अशी चुटपुट प्रत्येकाच्या मनात होती.
जयपूर हे दौर्‍यातलं खर्‍या अर्थाने स्टार केंद्र असतं. म्हणजे इथलं मंडळ फार मस्त आहे. इमारतच नाही तर सभासद मंडळी, त्यांचा उत्साह, व्यवस्था, प्रेक्षक सगळंच आणि हे वर्षही या सगळ्याला अपवाद नाही ठरलं.
प्रयोग उत्तम रंगला. छोट्या-छोट्या गोष्टी प्रेक्षकांनी टिपल्या आणि त्यांचं खास कौतुक केलं .. हशे आणि टाळ्यांच्या पावत्यांवर पावत्या फाडल्या जात होत्या. आणि कलाकारांना आणखी-आणखी ऊर्जा मिळत होती. दुसर्‍या अंकातले अदलबदलीचे दोन प्रवेश जयपूरच्या प्रेक्षकांसमोर उत्तम रंगले. मैफल ह्या धाग्यातले पहिले तीन प्रवेशही जयपूरच्या प्रेक्षकांची मनं जिंकू शकले. एकंदरीत एक उत्तम प्रयोग करत हा दौरा कलाकारांनी संपवला.
मग आजचा दिवस जयपूरदर्शन, खरेदी आणि महाप्रसादाचं जेवण !
आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे डिस्चार्ज झालेले मोबाइल्स चार्ज करणे आणि व्यवस्थित गादीवर उताम झोप काढून विश्रांती घेऊन स्वतःलाही रीचार्ज करण्यात आजचा दिवस गेला आणि रात्रही अशीच काढली जाईल. कारण उद्यापासून परतीच्या प्रवासात पुन्हा हलत्या गाडीत धकधक झोप काढायची आहे !
Advertisements

2 thoughts on “दौर्‍याची सांगता .. बातमीपत्र – ६

  1. Just reached. Daura khoop masta zhala. Jari bags uchalatana haalat kharab zhali asel tari tyachi hi majja ali… Abhishek ani Chinmay nasate barobar tar evdhi majja nakich nasati ali.. I owe it to them… Jaypur la natak zhalyavarahi vel hota mhanun khoop time pass karata ala… Amhi ushyanni maramari keli… Dhammal ali…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s