दौरा बातमीपत्र – ४ :

Meherangarh Fort, Jodhpur
Image via Wikipedia
जोधपूरला येणारी आमची गाडी एक तास उशिरा पोहोचली. मस्त कचोरी आणि नमकीन पदार्थांची न्याहारी करण्यापासून आम्ही स्वतःला रोखूच शकलो नाही. जोधपूर शहरात आगमनच असं चविष्ट झालं.
मग थोड्डिश्शी विश्रांती घेऊन आम्ही जोधपूरचा प्रसिद्ध किल्ला पाहायला गेलो. या किल्ल्यावरच्या तोफा, तिथे आता असलेले रहिवासी, गल्ली-बोळ यांची मौज औरच आहे. किल्ल्यावरून दिसणारं शहराचं रंगीत दृष्य अनेक चित्रपटांमधून पाहिलं होतं पण आज प्रत्यक्ष पाहायला मिळालं. खूपच मजा केली या छोट्याश्या सहलीत.
मग दुपार थोडा आराम, थोडी तयारी अशी संमिश्र गेली.
थोडा पाऊस झाला असल्याने आयोजकांनी प्रयोग उशिरा सुरू करायचं ठरवलं. ९ वाजता प्रयोग ठरला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रेक्षक कमी होते. मग प्रयोग सुरू केला. विश्रांती आणि तालीम दोन्हीही
मिळाल्यामुळे कलाकारांमधला नागपूरला मिळालेला आत्मविश्वास आणखी वाढत गेला आणि हा प्रयोगही उत्तम झाला. इतकंच काय, प्रयोग उशिरा सुरू झाला होता, त्यामुळे उत्स्फूर्तपणे सलग प्रयोग करायचं ठरलं आणि मध्यंतर न घेता सलग प्रयोग केला.
आयोजक आणि काही पाहुणे (जे इथल्या कला अकादमीचे सदस्य आहेत) ते येऊन कौतुक करून गेले. प्रयोग आवडला, गेल्या वर्षीपेक्षा उजवा वाटला, आम्ही अगदी गुंतलो होतो, छान करता अश्या प्रतिक्रिया आल्या.
मग आवराआवरी करून जेऊन झोपायला यायला रात्रीचे दोन वाजले. ह्या झोपेचा हिशेब कोट्याच्या गाडीत निघणार आहे हे नक्की !
राजस्थानमधून बातम्या यायला काही ना काही विलंब होतो आहे. पूर्वी उंटांवरून सांडणीस्वार आरामात येत असतील म्हणून हे ठीक होतं, पण प्रयोगांच्या वेळा, त्यानंतर लगेचचे प्रवास आणि त्या सर्व धामधुमीत वृत्तांत मिळण्यात होणारा उशीर यामुळे आता यानंतरच्या तीन प्रयोगांच्या दिवसांचा नि नंतर जयपूरमधल्या एका दिवसाच्या वास्तव्याचा नि मग परतीच्या प्रवासाच्या  दीड दिवसाचा वृत्तांत इथे द्यायचा बेत रहित करत आहोत. पण दौरा मस्तच होईल यात शंका नाही .. तेव्हा आतापासून एक तत्व आपण सगळेच पाळूया … NO NEWS IS GOOD NEWS !
Advertisements

2 thoughts on “दौरा बातमीपत्र – ४ :

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s