दौरा बातमीपत्र – ३

Agra - Taj Mahal
दौर्‍याचा आजचा तिसरा दिवस. बीना जंक्शन वर सुवर्णजयंती एक्सप्रेस आली तेव्हा सुरू झालेला हा दिवस कधीच न विसरावा असा .. कारण रेल्वेत सुरू होऊन रेल्वेत संपलेल्या या दिवसाचा सूर्य मात्र ताज च्या साक्षीने मावळला. आतापर्यंत हा दौरा (विशेषतः मैथिलीकरता) एक रोजची व्यायामशाळा पण होऊन बसला आहे. आपापल्या बॅग्ज उचलून-उचलून आमचे “मसल्स मस्त फुगलेले दिसणार आहेत” असंच मैथिलीला वाटतंय.
दुपारी २.३० च्या सुमारास आग्र्याला पोहोचलो. मग इथल्याच एका हॉटेलमधे सामानसुमान ठेऊन, आंघोळी वगैरे उरकून आग्र्याचा किल्ला पाहायला गेलो. शुभम नावाचा आमचा गाईड फारच मस्त होता. गेल्या दिल्ली दौर्‍याच्या वेळी हा बहुधा दोस्तीत आला .. पण त्याने खरंच खूपच मस्त “गाईड” केलं.
प्रथम पाहिला आग्रा फोर्ट. आग्य्राचा सुप्रसिद्ध किल्ला. शिवाजी महाराजांनी जिथून “ग्रेट एस्केप” साधली त्या आग्य्रामधे नि त्या किल्ल्यामधे प्रथमेशला खूपच “स्फूर्तीदायी” वाटलं. मैथिलीला ही सगळं केवळ आता “उरल्या-सुरल्या”त जमा होत चाललंय याच्या वेदना जाणवल्या. म्हणजे इतकं सुंदर काहीतरी, सर्व जाणिवांना समृद्ध करणारं, असं काळाच्या प्रभावाखाली “महत्वाचं न राहात जाण्याची” ही प्रक्रिया अस्वस्थ करणारी वाटली तिला.
तीन मोगल शहेनशाह इथे प्रत्यक्ष नांदले. स्थापत्यकलेचा फारच मस्त नमुना आहे हा. प्रथमेश सगळं काही त्याच्या विशेष नजरेने टिपत होता. निखिल देवला मात्र सगळीकडे वेळ कमी पडला असं वाटत राहिलं.
ताजच्या शाही दरवाज्यातून आत शिरताना जे त्याचं विलोभनीय दर्शन घडतं, ते सगळ्यांनाच मोहित करणरंच असतं. बाहेर तसा अजून प्रकाश असला तरी ताजच्या मुख्य इमारतीत आतमधे अंधार होत चालला होता. आमच्या गाईड शुभम ने सोबत आणलेल्या बॅटरीच्या मदतीने अंधारात ती बॅटरी दगडी भिंतीकडे धरून चंद्रप्रकाशात लख्ख चमकणार्‍या ताजच्या भिंती आणि त्यातल्या जडजवाहीरांच्या चमकण्याचं एक छोटं प्रात्यक्षिक दिलं. हे प्रात्यक्षिक कधीही विसरलं जाणार नाही. आता पौर्णिमेच्या चांदण्यात ताज पाहाण्याची ओढ मनाला लागली आहे.
प्राजक्ता, स्मिता, आशिष, राहुल, अमृता आणि विक्रांत यांना बहुधा जास्त काही बोलावं असं वाटत नसावं. ते नॉर्मल होते. काहीश्या रेग्युलर किंवा रूटीन मजेत. त्यांनी यापूर्वी हेच सगळं अनुभवल्यामुळे असेल कदाचित. असो.
रात्री जोधपूरच्या गाडीसाठी आग्रा फोर्ट स्टेशनवर आलो. आमची गाडी आधीच तिथे हजर होती. आम्ही गाडीत बसलो आणि ताज आणि आग्रा फोर्टच्या प्रतिमा डोळ्यात बंद करत झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो.
Some interesting links about Agra !
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s