दौरा बातमीपत्र – १

सगळेजण ठरल्याप्रमाणे ११ तारखेला पुण्याहून निघाले. कोईम्बतूर – कुर्ला गाडी अगदीच वेळेत आली. कल्याणला वेळेत पोहोचली. कल्याणला सेवाग्रामही वेळेत आली, नागपूर ला वेळेत पोहोचली. पण पुढली गाडी, गोंडवन एक्सप्रेस उशिरा धावत होती. ती गाडी ११ च्या पुढे नागपूर ला येणार होती, म्हणून मग सगळे आशिष च्या घरी गेले. मग काही तयारी तिथेच करून जास्तीचं सामान तिथेच ठेवून प्रयोगापुरतं सामान प्रत्येकी घेऊन सगळ्यांनी रायपूर ला प्रयाण केलं. रायपूरच्या यजमानांनी उत्तम व्यवस्था केली होती. सामानासाठी वेगळी गाडी, टीम साठी वेगळी १२ सीटर गाडी, तसंच जेवण तयार ठेवलं होतं. पण गाडी उशिरा पोहोचल्यामुळे आपली जरा कसोटीच होती. कारण त्यांनी प्रयोग ७.३० चाच जाहीर केला होता. असो.

काही तयारी  व्हायची असल्याने प्रयोग ८.३० ला सुरू करायचा ठरलं. ८.४० ला प्रयोग सुरू झाला. प्रयोग आपल्या पद्धतीने उत्तम दर्जाचा झाला नाही. पण भरत मधल्या शेवटच्या तालमी इतका वाईटही नाही झाला. पहिल्या अंकात प्रेक्षकही खूप होते, हसत होते त्यामुळे बरं वाटलं, दुसरा अंक चांगला झाला, पण प्रेक्षक उशीर झाल्यामुळे थांबले नाहीत. ४०-५०  प्रेक्षकच उरले होते. पण आयोजकांना प्रयोग आवडलेला दिसतोय.

म्हणजे एका अर्थाने ही एक रंगीत तालीम झाली .. अहं अहं .. नाटकाची नाही .. ती तर ९ तारखेला झाली होती .. पण गाड्या उशिरा येणं .. प्रयोगाच्या आधी फारसा वेळ न मिळणं, प्रेक्षक असणं-नसणं आणि तरीही आपण प्रयोग निभावू शकणं .. या सगळ्याची रंगीत तालीमच नाही का ही ?

प्रयोगानंतर जेवणाच्या वेळी, आयोजक आणि इतर काहींनी कौतुक केलं, “आमच्या मंडळात वर्षभरात सहा नाटकं होतात तेव्हा तुमचं नवीन नाटक तयार असलं की आम्हाला कळवत जा” असंही म्हणाले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s