सज्ज झालेले सख्खे शेजारी !

उद्या, म्हणजे ९ सप्टेंबर २०१० ला ‘पीडीए’च्या ‘सख्खे शेजारी’ची रंगीत तालीम. भरत नाट्य मंदीरमधे सकाळी ९ वाजता ही रंगीत तालिम सुरू होईल. नाटक आता बर्‍यापैकी तयार आहे .. म्हणूनच .. सज्ज झालेले सख्खे शेजारी !

श्रद्धा देशपांडे आणि आशिष हे किसन (कृष्णा आणि तात्या) आणि गोपी म्हणून मज्जा करत आहेत. प्रथमेश यापूर्वीही कोणत्याही नाटकात जितक्या उत्कृष्ट फोकसने काम केलंय त्याच पद्धतीने मस्त काम करतो आहे. प्राजक्ताची मध्यम वर्गीय करीअर वूमन निर्मलपण ठाशीव होते आहे. मकरंद आणि शर्वरीच्या जोडीतला ताजेपणा मस्त आहे.
दौर्‍याच्या कार्यक्रमात थोडा बदल आहे. एक तर नागपूरच्या १३ तारखेच्या प्रयोगाच्या आधी रायपूरला १२ तारखेला एक प्रयोग नव्याने मिळाला आहे आणि अजमेरच्या आणि कोट्याच्या प्रयोगांच्या तारखांची अदलाबदल झाली आहे.
संघातही अजून काही बदल होत आहेत .. ते पडताळून पाहिले जाताहेत. रंगमंचव्यवस्था हा महत्वाचा भाग हाताळण्यासाठी संघही तसाच मजबूत लागतो. ती सर्व व्यवस्था उद्या पडताळून पाहिली जाईल आणि मग ११ तारखेला हे नाटक दौर्‍यावर प्रयाण करेल.

3 thoughts on “सज्ज झालेले सख्खे शेजारी !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s