२१ ऑगस्ट २०१० “शोकपर्व – पानिपत १७६१”चा दुसरा प्रयोग !

पेशवाई चं नाटक जून च्या मध्यापर्यंत पर्वतीवर सादर होतं आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी (किंवा काहीवेळा दुसर्‍या शनिवारी) कोथरूडच्या मृत्युंजयेश्वर मंदिरात त्याच नाटकाचा दुसरा प्रयोग सादर केला जातो. गेल्या वर्षी दूर देशीच्या डुकरांमुळे हा प्रयोग होऊ शकला नव्हता असंच म्हणावं लागेल .. अर्थात .. जगभर स्वाईन फ्लू बोकाळला होता ना … त्यामुळे !
असो !
दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षीही ह्या प्रयोगाला .. म्हणजे पेशवाईच्या दुसर्‍या प्रयोगापुढे वाढून ठेवलेल्या अडचणी आ वासून उभ्या होत्याच !
सर्वात पहिली अडचण असते ती मेक-अप ची .. दरवर्षी अगदी ह्याचवेळी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा असते. त्यामुळे भावेकाका रंगभूषेसाठी उपलब्धच नसतात. तसेच ते ह्यावेळीही नव्हते. (ह्याला अपवाद अधिक श्रावण महिना असतो बरं का ..) मग कोण आहे, कोण नाही करता करता .. खूप ऐन वेळेला माधव थत्ते उपलब्ध होऊ शकणार आहेत हे कळलं आणि आमच्या जीवात-जीव आला. थत्ते हे अलिकडच्या पुनर्निर्मित घाशीराम कोतवालचे आणि रायगडाला जेव्हा जाग येते चे रंगभूषाकार असल्यामुळे त्यांच्याकडेच गोटे, दाढ्या आदि सामान भरपूर प्रमाणात आहेच. ते त्यासह सिद्ध झाले.
नव्यानेच नोकरी लागलेले आणि नव्या शैक्षणिक वेळापत्रकात गुंतून पडलेले काही जुने जाणते कलाकार आणि नव्या कलाकारांपैकी दोन कलाकार आजारी अश्यामुळे नानासाहेब पेशवे, गोपिकाबाई, शुजा उद्दौला, शुजाची आई सद्रुन्निसा, एक ब्राह्मण ह्या पात्रांसाठी नव्या कलाकारांची योजना करावी लागली. त्यातले तीनजण तर प्रथमच रंगमंचावर पाय ठेवत होते. याशिवाय पहिल्या प्रयोगात जाणवलेल्या गोष्टींमधून इब्राहिमखानाला काही प्रमाणात अधिक प्रतिनिधित्व द्यायला हवंय हे लक्षात आल्यामुळे इब्राहिमखानाची जागा तीन प्रवेशांमधे मुक्रर केली गेली. म्हणजे त्या जागी आणखी एक कलाकार ! म्हणजे १७ पात्रांमधे ६ जण नवीन !
मृत्युन्जयेश्वर मंदीर भर कर्वे रस्त्यावर आहे. इथे श्रावणात असलेली गर्दी, गाड्यांची रस्त्यावरची सततची वर्दळ आणि आता तर या मंदिराच्या दोन्ही बाजूंना समांतर रस्ते असल्याने दुचाकी चालकांचे हॉर्न्स असे भाग एकाग्रता भंग करणारे ठरतातच आणि म्हणूनच पर्वती इतकी मजा कलाकारांना अनुभवता येत नाहीच इथे. शिवाय मेक-अप रूम ते रंगमंच अंतर प्रचंड जास्त असल्याने त्याबाबतीत जे रंगमंचापाशी आल्यावर असेल ते अंतिम अशी अवस्था होऊन बसते !
ह्यावेळी रंगमंच्याच्या फक्त मागच्या बाजूला (तिसरी विंग) पात्रांना रंगमंचावर प्रवेश ठेवण्यात आल्याने आणि मागे काळ्या ऐवजी पांढरा पडदा लावल्याने ह्या दोन आयत्यावेळच्या अडचणी येऊन पडल्या होत्याच …
तर अश्या सगळ्या परिस्थितीत प्रयोग झाला ..
… उत्तम नाही झाला. जरा धिम्या गतीचा नि त्यामुळे काही जणांसाठी काही प्रमाणात कंटाळवाणाही ठरत गेला असावा.
पण रंगमंच्याचा बरोब्बर समोर बसलेल्या अनेक प्रेक्षकांना मुळातच एकाग्रता साधता येणं सोप्पं जात असल्यामुळे म्हणा (किंवा रस असल्याने ते तसे बसलेले असल्याने म्हणा ..) प्रयोग आवडला .. गाणी, लेखन, आणि काही कलाकारांचा अभिनयही !
ह्या प्रयोगाचं व्हिडिओ चित्रीकरण करावं असं वाटत होतं .. ते जमलं नाही .. पण प्रसाद दाबके आणि प्रथमेश पराशर हे पेशवाईतले नामांकित आणि माजी कलाकार आपले कॅमेरे सरसावून इकडेतिकडे फिरून काही फोटो टिपताना दिसत होते. इतक्या सगळ्या गडबड-गोंधळातही आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसतानाही त्यांना आमचं नाटक फोटो काढण्याच्या लायकीचं वाटलं हेच विशेष !
त्यांनी टिपलेली ह्या प्रयोगातली काही क्षणचित्रं …
Advertisements

One thought on “२१ ऑगस्ट २०१० “शोकपर्व – पानिपत १७६१”चा दुसरा प्रयोग !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s