पी डी ए चं वर्षातील पहिलं नाटक : ” शोकपर्व : पानिपत १७६१” !

पी डी ए चं शिबीर संपलं आणि आता वर्षातील पहिलं नाटक सुरु झालं … पेशवाई चं नाटक ! या वर्षी पेशवाई आहे २ जुलै ला .. पर्वतीवर २ जुलै ला सायं ६.३० ला पीडीए ची मुलं सादर करतील नाटक .. ” शोकपर्व : पानिपत १७६१”

लेखन / दिग्दर्शन / गीते / संगीत : प्रदीप वैद्य

नेपथ्य आणि दिग्दर्शन सहाय्य : निरंजन गोखले

वेशभूषा : अमृता वाणी आणि प्राजक्ता पाटील

प्रकाश योजना : विक्रांत ठकार

निर्मिती सहाय्य : आशिष वझे, शची जोशी, प्रतीक्षा हर्डीकर

संगीत साथ : अभिजित ढेरे ( ढोलक ), चिंतामणी निमकर (हार्मोनियम)

रंगभूषा : प्रभाकर भावे

निर्मिती सूत्रधार : शशिकांत कुलकर्णी

गायिका आणि निवेदिका : रूपाली भावे, सायली सहस्रबुद्धे, संयोगिता पेंडसे

भूमिका व कलावंत :

भाऊ : अभिषेक ओगले, नानासाहेब पेशवे : निखील मुजुमदार, गोपिकाबाई : श्रद्धा देशपांडे, बळवंतराव मेहेंदळे : पराग खोपकर, लक्षुमीबाई मेहेंदळे : अदिती नाईक, रघुनाथराव दादा : गिरीश हांडे, बापू : रोहित बंटवाल, मावळा १ : राहुल मोरे, मावळा २ : कुशल गुप्ते, अब्दाली : नील बेंद्रे, नजीब : निनाद पवार,  एक ब्राह्मण आणि शुजा उद्दौला : सौरभ मुळे, शुजा ची आई : अर्चना भरम.

या नाटकाच्या सादरीकरणासाठी खूप आधीच सगळी व्यवस्था करावी लागते. पर्वतीवर एकदा गेलं की पुन्हा पुन्हा काही आणायला खाली आणता येत नाही .. त्यामुळे नाटकाचं व्यवस्थापन करणारी आमची टीम या प्रयोगांमुळे अगदी तयार होत गेली आहे.

प्रयोगाची जागा म्हणजे नानासाहेब पेशवे स्मारक .. त्यामुळे जेमतेम १५ फूट बाय १२ फूट असा रंगमंच असतो .. त्यावर तो काळ उभा करणं हे आव्हान दरवर्षी घ्यायचं असतं.

गेली ३० वर्षं हा उपक्रम चालूच आहे. पूर्वी कै. भालबा केळकर खूप कमी वेळात जवळ्पास इम्प्रोवाईज करूनच ही नाटकं तयार करत असत. मग त्यानंतर अनेकांचे हात या उपक्रमाला लागले आहेत. अनेक वर्षं दोन नाटकं सादर होत आली आहेत. एक नाटक हे मूळ इतिहासातल्या घटनांबरहुकूम आणि दुसरं .. एखादं प्रहसन. हे प्रहसन केवळ त्या काळावर बेतलेलं असतं.

भालबांप्रमाणेच शशिकांत कुलकर्णी, केशव घुले, मेघना वैद्य, दिलीप वेंगुर्लेकर, प्रदीप फाटक, बापू जोशी, केदार दिवेकर, मैथिली पागे, प्रदीप वैद्य .. ही या उपक्रमात सहभागी लेखक्-दिग्दर्शकांची काही नावं सांगता येतील …

एखाद्या संस्थेने, आपण जेथे काम करतो आहोत त्या शहराच्या किंवा तिथल्या माणसांच्या इतिहासावर आधारित असं एक नाटक दरवर्षी न चुकता करायचं .. ते ही दर वर्षी नवीन नाटक आणि ते ही ३० वर्षं हा एक आगळा वेगळा विक्रमच आहे ..

आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही या विक्रमात सहभागी आहोत .. असतो आणि या पुढेही असू !

गेल्या वर्षी आम्ही पेशवाई साठी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या संपूर्ण जीवनपटावर आधारित असा एक १७ मिनिटांचा पोवाडा नृत्यनाट्य स्वरूपात सादर केला होता त्याची ही काही क्षणचित्रे …

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s