राज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए !

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबरच महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी नाटकाच्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. या स्पर्धा पूर्वी मुम्बई इलाक्याच्या होत असत .. त्याच आता महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा म्हणून होऊ लागल्या.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासूनच पी डी ए या स्पर्धेतील एक मह्त्वाचा सहभागी संघ ठरत आला आहे. पहिल्या वर्षी पी डी ए चं नाव मात्र इंटरकॉलेजिएट ड्रॅमॅटिक क्लब असं होतं .. मग ही स्पर्धा जिंकल्यानंतर जवळपास लगेचच प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन अर्थात पी डी ए हे नामकरण केलं गेलं. पी डी ए तेव्हापासून आज या स्पर्धेच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत विविध नाटकं या स्पर्धेत सादर करत आली आहे.
प्रथम भालबा केळकरांनी मग डॉ. श्रीराम लागूंनी ही स्पर्धा खूपच गाजवली. नंतरच्या काळात आले डॉ. जब्बार पटेल. घाशीराम कोतवाल हे नाटक पी डी ए ची राज्य नाट्य स्पर्धेची (बहुधा १९७२ सालची) प्रवेशिकाच होती. पुढे लोकांच्या विरोधाला मान तुकवून हे नाटक चालू न ठेवण्याचा जो निर्णय भालबा आणि त्यांच्या काही सहकार्‍यांनी तेव्हा घेतला, त्यातून थिएटर अकॅडमी अस्तित्वात आली. घाशीराम कोतवाल राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसर्‍या क्रमांकावर आलं होतं. परिक्षकांमधे त्यावेळी या नाटकाला संगीत नाटकात धरायचं का नाही यावर वाद झाले होते अश्या काही रंजक गोष्टी .. ऐकलेल्या .. अर्थातच.
पुढच्या काळात भालबा, रामकाका खरे, घुलेकाका त्यानंतर अजित सातभाई, मेघना वैद्य, प्रदीप फाटक आणि दिलीप वेंगुर्लेकर यांनी विविध नाटकं फक्त सादर करत नव्हे तर विजयी करत ही परंपरा चालूच ठेवली. याच काळात थिएटर अकॅडमीच्या स्थापनेमुळे, किंवा मधून किंवा तात्कालिक काही वैयक्तिक कारणांमुळे, पी डी ए थोडीशी बर्‍याच नाट्य रसिकांची नावडती होत गेली. आणि एकीकडे राज्य नाट्य स्पर्धासुद्धा तिच्यामधला प्राण हरवत गेली.
या मधल्या काळात भालबांच्या निधनानंतर मेघना वैद्य, दिलीप वेंगुर्लेकर या दोघांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपलं असं एक स्थान निर्माण केलं. तलेदंड, ओझ्याविना प्रवासी आणि प्रदीप फाटक चं अश्वदान ही नाटकं अंतिम फेरीपर्यंत पुढे जाऊन विजेतीही झाली.
आलिकडच्या काळात मोहित टाकळकरने त्याच्या नाट्यदिग्दर्शनाची सुरूवात पी डी ए तूनच केली त्यातले दोन महत्वाचे टप्पे “ययाती” आणि “नाणेफेक” ही नाटकं. २००० आणि २००१ साली ही नाटकं पीडीएच्या राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रवेशिका होत्या. प्राथमिक फेरीत जवळपास सर्व विभागांमधे बक्षिसं मिळवून ही नाटकं अंतिम फेरीत गेली होती.
पुढे या वाटेवर पीडीएची आगेकूच चालू ठेवली आहे प्रदीप वैद्यने. पहिल्या वर्षी “आणि क्षिप्रा वाहात राहिली” या नाटकाला तसं काहीच यश मिळालं नाही .. पण मग “सहस्रचंद्रदर्शन” ने प्राथमिक फेरीत सर्व विभागांमधे बक्षिसं पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवत मग अंतिम फेरीतही हा धडाका कायम ठेवला. राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाने दोन्ही फेर्‍यांमधे मिळून एकूण १६ वैयक्तिक आणि २ सांघिक पुरस्कार मिळवले. अलिकडच्या काळात अंतिम फेरीत पहिल्या तीन नाटकांत आलेलं पीडीए चं हे एक महत्वाचं नाटक. मेघना वैद्यच्या “ओझ्याविना प्रवासी” नंतर तब्बल १३ वर्षांनी पीडीएचं नाटक अंतिम तीन नाटकांत आलं.
पुढे अचलायतन या नाटकाने प्राथमिक फेरी “क्लीन स्वीप” करत गाजवली, पण अंतिम फेरीत तांत्रिक दोष घातक ठरले आणि गेल्या वर्षीचं “प्राइस टॅग” हे नाटक प्राथमिक फेरीत दुसरं आल्याने अंतिम फेरीत गेलंच नाही. प्राथमिक फेरीची प्रथम क्रमांकाची अलिकडच्या काळातली पुण्यातली “हॅट ट्रिक” साधली गेली नाही.
आता या वर्षी पीडीए ६०व्या वर्षात पदार्पण करत असतानाच राज्य नाट्य स्पर्धा पन्नास वर्षांची होत आहे. गेल्या ५० वर्षांमधे पीडीए ने ३८ नाटकं सादर केली. पैकी ३१ नाटकांनी अंतिम फेरी गाठली. आणि अंतिम फेरीत विजयी झालेली त्यातली २६-२७ नाटकं तरी नक्की आहेत. या वर्षी पुणे केंद्रात स्पर्धकांचा उत्साह उत्तम आहे. आसक्त, समन्वय हे संघ दणक्यात उतरणार आहेत. पीडीए सुद्धा सहभागी असेल.
पीडीए ची याबाबत नेहेमीच ही भूमिका होती आणि असेल की “प्रयोग झाला की स्पर्धा सुरू होते” तीही परिक्षकांच्या मनात. स्पर्धकांनी उत्तम नाटक सादर करावं हेच खरं .. उत्तम म्हणजे आपल्याला आपलं आपलं जे उत्तम वाटत असतं ते ..
निकाल लावणारे जो लावतील तो उत्तम हेच खरं !
त्यामुळे ६० वर्षांची पीडीए, ५० वर्षांच्या राज्य नाट्य स्पर्धेचा हात यावर्षी कसा धरू शकते हे औत्सुक्य आम्हाला सगळ्यांनाच आहे.
सहस्रचंद्रदर्शन
Advertisements

One thought on “राज्य नाट्य स्पर्धा आणि पी डी ए !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s