pda poster 2015 teaser 1

Advertisements

नवीन नाटक “निर्मलग्राम”..

पी.डी.ए सादर करीत आहे ” निर्मलग्राम “

दिनांक २९ मार्च रात्रौ ९ वाजता भरत नाट्य मंदिर येथे 

        या नाटका विषयी थोडेसे… 

“निर्मलग्राम”

 

“निर्मलग्राम योजनेअंतर्गत मंजूर झालेले संडास ज्या गावात अजून बांधले गेले नाहीत, त्या गावातल्या निवासी शिक्षकांनी ते बांधून घ्यावेत” असा सरकारी आदेश काही वर्षांपूर्वी निघाला होता..

अशाच एका गावात, नव्यानेच शिक्षिका म्हणून भरती झालेल्या कुलकर्णी बाईंना या आदेशामुळे बराच त्रास सहन करावा लागतो.. गावातल्या सरपंच आदी मंडळींना गावात स्वच्छताग्रुह बांधणं कसं गरजेचं आहे हे पटवून द्यायला जातात.. पण काहीही न करण्याची सवय लागलेल्या राजकारणी मंडळींचा हे काम करण्यातला उत्साह कमालीचा असतो तो त्यात मिळणा-या अनुदानामुळे आणि बक्षिसाच्या रकमेमुळे.. ते सरकारी आदेशाचा आधार घेऊन नकळतपणे संडास बांधायची सर्व जबाबदारी बाईंवर सोपवतात.. एका अर्थाने त्यांना त्यात अडकवतात..

शाळेचे वर्ग आणि संडासाचं बांधकाम एकत्र करणं शक्य नाही हे बाईंचं बोलणं कोणीच मनावर घेत नाही.. बाई प्रतिकाराचा प्रयत्न करतात तेंव्हा गोड बोलून, प्रसंगी धमकावून त्यांना संडास बांधून घेण्यासाठी मजबूर केलं जातं.. शिक्षकांना जास्तीची शिक्षकेतर कामं करण्यासाठी सरकार कडूनच दबाब येत असल्यामुळे आपली कैफियत कोणापुढे मांडावी हे बाईंना कळेनासं होतं. ज्यांच्यासाठी त्या लढत आहेत त्यांचीही साथ मिळंत नाही म्हंटल्यावर बाई हतबल होतात आणि स्वत:च संडास बांधायला घेतात…!!

 

Image

 

   निर्मलग्राम या नाटकाविषयी बोलताना या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक केदार म्हणाला,

“आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात ज्या बघून आपल्याला हे काय चाललय..! असा प्रश्न

पडल्याशिवाय राहत नाही…असाच मला पडलेला एक प्रश्न…शिक्षकांच्या बाबतीतला…मध्यंतरी वर्तमान पत्रात एक बातमी होती..ती वाचून आपल्या सरकारच्या दृष्टीकोनाची गम्मत वाटली..शिक्षकी पेशाच काही एक पावित्र्य होत कोणे  एके काळी…हो कोणे एके काळी असाच दुर्दैवाने म्हणावा लागेल..कारण शिक्षक हा सुद्धा एक सरकारी नोकर आहे या भूमिकेतून सरकार कडून त्यांची प्रचंड गळचेपी होते …शिक्षणेतर अशा अनेक कामांमध्ये केवळ एक सरकारी नोकर या नात्याने त्यांना अक्षरशः जुंपले जाते …म्हणजे सामाजिक भान ज्याचे त्याला असतेच…पण सरकारतर्फे ते लादले जाणे हा एक हास्यास्पद प्रकार आहे..अश्या काही घटनांमध्ये “अति झाल आणि हसू आल..” अशी गत होते..त्यात असलेली विसंगती अशावेळी अनेक पटीने मोठी होऊन दिसायला लागते …ती अशीच मला एका GR मध्ये दिसली..त्यावर माझ प्रामाणिक मत व्यक्त करणे गरजेचे वाटले म्हणून हा नाटक-प्रपंच.. “

      तेव्हा  या नाटकाचा प्रयोग पाहायला नक्की या.. २९ मार्च रात्रौ ९ वाजता… भरत नाट्य मंदिर येथे…

 

 

 

 

 

अर्धुक….

नमस्कार…

प्रोग्रेसिव ड्रामॅटिक असोसिएशन सादर करीत आहे  “अर्धुक”…

लेखक :- डॉ. समीर मोने.

दिग्दर्शक :- दिलीप वेंगुर्लेकर.

दिनांक ९ जानेवारी २०१३ रोजी रात्रौ ९.३० वा.

स्थळ :- ज्योत्स्ना भोळे सभागृह , उद्योग भवन ‘डी’ ,

हिराबाग गणपती जवळ, टिळक रोड.

IMG_0256 IMG_0125 IMG_0148 IMG_0192

नवीन नाटक अर्धुक

अर्धुक

अर्धुक म्हणजे अर्धा भाग .माणूस जीव जन्माला येतो तेव्हा त्याला जाणीव होते की, आपण अर्धे आहोत. अर्धुक आहोत. मग त्याची धडपड चालू होते ती पूर्णत्वाची. आपल्याशी चपखल जुळेल असा अर्धा भाग शोधून एकसंध होण्याची शोधयात्रा सुरु होते.

पुरुष आपला अर्धा भाग बाईत शोधतो पण काहीतरी गल्लत होते ती इथेच कारण पुरुषी मानसिकता , गैरसमज. आपला अर्धा भाग कसा मिळवायचा, मिळालाच तर तो आपल्याशी तो घट्ट कसा बांधून ठेवायचा, या बद्दलच्या त्याच्या संकल्पनाच निराळ्या असतात. त्या सगळ्या शारीर असतात,लैंगिकतेशी निगडीत.

मनात असलेल्या गंडातूनच निर्माण होते मग अधिकार गाजवण्याची वृत्ती आणि अखंड अस्वस्थतेचा प्रवास. आपण कमी पडलो तर आपला अर्धा भाग निसटून जाईल हि भीती कधीच पिच्छा सोडत नाही. आणि हाती येते ती वंचना व प्रचंड भोगासाहित दुःख.

पुरुषी मानसिकते कडे एका वेगळ्या अर्थाने पाहण्यचा प्रयत्न म्हणजे हे नाटक,

प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटीक असोसिएशन सादर करीत आहे    “ अर्धुक ”

शनिवार  दिनांक १० नोव्हेंबर २०१२ रात्रौ ९.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर येथे.

या नाटकाच्या  तालमीतली  काही दृश्ये ..

Image

Image

Image

राजस्थान दौरा २०१२

नमस्कार..!!

        दरवर्षी प्रमाणे यंदाही पी डी ए चा गणपती दौरा यशस्वी पणे पार पडला.

यंदाच्या दौऱ्यात सादर झालेले पहिले नाटक म्हणजे श्रीनिवास भणगे लिखित “शांतेचं कार्ट चालू आहे ” या नाटकाचा 

पहिला प्रयोग जोधपूर महाराष्ट्र मंडळ येथे दिनांक २१ सप्टेंबर रोजी यशस्वी पणे पार पडला. 

जोधपूर येथील प्रयोगानंतर संपूर्ण संघाने जयपूर येथे प्रस्थान केले. जयपूर येथे दिनांक २२ सप्टेंबर रोजी याच 

नाटकाचा दुसरा प्रयोग पार पडला.

          या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा  सागर यार्दी याने अत्यंत यशस्वी पणे पेलली.

या नाटकातील कलाकार व तंत्रज्ञ यांची नावे पुढील प्रमाणे

व्यंकटेश  –   सागर यार्दी. 

शांता      –    श्रुती खांडेकर.

शाम      –     आशिष वझे.

दया       –     रसिका पटवर्धन.

माया     –      शर्वरी शाह.

काका     –      गिरीश दिक्षित.

इन्स्पेक्टर  –   प्रतिक काळे.

 

नेपथ्य व रंगभूषा –  स्मिता तावरे.

                         अमृता वाणी.

रंगमंच व्यवस्था  –  अजिंक्य ओव्हाळ.

प्रकाश योजना    –   जीवन भारती.

संगीत संयोजन  –   निखिल देव.

 

        सादर झालेल्या दोन्ही प्रयोगातील छायाचित्रे खास तुमच्यासाठी…

Image

 

Image

 

Image

 

 

Image

 

 

Image

 

 

ImageImage

 

Image

 

 

ImageImage

राजस्थान दौरा २०१२

नमस्कार..!!

गेली अनेक वर्षे पी डी ए ही संस्था महाराष्ट्रा बाहेर असणाऱ्या मराठी नाट्य रसिकांसाठी जुन्या गाजलेल्या नाटकांचे प्रयोग करते.

गणपती,कोजागिरी पोर्णिमा,होळी अश्या सणांचे औचित्य साधून  संबंधित शहरातील महाराष्ट्र मंडळे हा प्रयोग आयोजित करत असतात.

यंदा गणेश उत्सवाचे निमित्य साधून राजस्थान येथील जोधपूर, जयपूर आणि उदैपूर येथे पी डी ए तर्फे नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

दि. २१ सप्टेंबर २०१२ – जोधपूर – “शांतेच कार्ट चालू आहे”

दि. २२ सप्टेंबर २०१२ – जयपूर – “शांतेच कार्ट चालू आहे”

दि. २३ सप्टेंबर २०१२ – उदैपूर  – “सख्खे शेजारी”

नाटकाविषयी आणि कलाकारांविषयी जाणून घेऊया पुढील सत्रात……

पी डी ए नाट्य प्रशिक्षण शिबिर २०१२

जसा जसा मे महिना जवळ येत जातो तसे आम्हा सर्वाना वेध लागतात ते पी डी ए च्या नाट्य प्रशिक्षण शिबिराचे. यंदाच हे शिबिराच २१व वर्ष. साधारण एक महिना आधी पासून शिबिराची तयारी सुरु होते, शिबिर कधी घ्यायचं मार्गदर्शक म्हणून कोणा कोणाला बोलवायचं, कोणत्या कोणत्या मुद्यांचा समावेश करायचा, शिबिराची जागा काय असेल असे अनेक…

यंदाच्या शिबिराचा अभ्यासक्रम थोडा बदलायचं अस ठरल. विद्यार्थ्याला फक्त अभिनय नाही तर नाटकाच्या प्रत्येक अंगाची ओळख झाली पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याचा कल कळेल. यानुसार शिबिराची रचना ठरली. १० मे ते ३ जून या कालावधीत शिबिर घायचे नक्की झाले. शिबिरामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो त्यानुसार “दिलीप वेंगुर्लेकर” आणि “रुपाली भावे” यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्याचे नेमके परीक्षण करून २१ विद्यार्थी यंदाच्या शिबिरासाठी निवडले गेले.

शिबिर उत्तम पणे पार पडण्यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे असते. आशिष, स्मिता, अमृता, गीतांजली यांनी ही जबादारी उत्तम पणे पार पाडली. सेवासदन चा हॅाल स्वच्छ करण्यापासून ते चहा आणण्या पर्यंत सर्व कामे वाटून दिली गेली. या सर्व कामांमध्ये आमचे “शकु काका” (अर्थात शशिकांत कुलकर्णी ) हे खंबीरपणे सर्वांबरोबर होते.

१० मे २०१२ ठीक संध्याकाळी ५ वाजता शिबीर सुरु झाले.  या शिबिरात दिलीप वेंगुर्लेकर, रुपाली भावे, किरण यद्नोपावित, श्रीनिवास भणगे, प्रसाद वनारसे,मेघना वैद्य, कल्याणी कुलकर्णी, अतुल पेठे, गंधर संगोराम, अनिरुद्ध खुटवड, आनंद चाबुकस्वार आणि समर नखाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिराचा समारोप हा विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाने होतो. त्यानुसार शिबिरातील विद्यार्थ्यांचे गट पाडले गेले व त्यांना एक मार्गदर्शक नेमून देण्यात आला. शिबिराचे शेवटचे ४ ५ दिवस हे या सादरीकरणाच्या तालमींसाठी असतात. यंदा मनोमिलन (मार्गदर्शक दर्शन पाटणकर ) स्पर्श ( मार्गदर्शक गीतांजली जोशी) रक्तपुष्प (मार्गदर्शक आशिष वझे) ज्याचा त्याचा प्रश्न (मार्गदर्शक रुपाली भावे) या नाटकातील छोटे प्रवेश सदर करण्यात आले.

३ जून २०१२ रोजी सुदर्शन रंगमंच येथे यंदाच्या शिबिराचा समारोप झाला. या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अतिश आळेकर उपस्थित होते.

या शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..

अनुरोध तोडेवाले 

पी. डी. ए. बद्दल खरं तर किती बोलाव तेव्हढ कमीच होईल पण तरी काहि गोष्टी नमुद करतो.

सगळ्यात मह्त्वाचि गोष्ट म्हणजे शिस्त ज्याचि तुम्हाला पूर्वसुचना हि मिळालेलि असते. आणि ती इतकी  काटेकोर पणे पाळली जाते कि सुरवातिला आपल्याला असे वाटु शकते कि कुठुन इथे आलो.

पण जसे जसे तुम्हि वर्कशॉप करु लागता तसे तुम्हाल त्याचे महत्त्व कळु लागते. थोड्क्यात सांगायचे तर ‘ईटस सिरियस बि़जनेस’ आणि वेळ जात नाहि म्हणुन नाटक करायला आलेल्यांना इथे जागा नाही. कलाकार घडवणे म्ह्णजे खायचे काम नव्हे असा खासच पुणेरि टच.

आर्थात ते खर हि होतं जेव्हा एक एक करुन यांच्या फॅकल्टि चि ओळख होते.

तसं पहायला गेलं तर सगळ्यांच्या सेशन बद्द्ल कमीत कमी  एक पान लिह्ता येईल पण मला वाटतं कि हा नुसतं वाचण्यापेक्शा प्रत्येकाने हा अनुभव घेउनच बघावा.

यांचा साधेपणा, सहजता, बेसिक्स वर दिलेला भर आणि कोण्त्याहि प्रकारचि व्याव्सयिक्ता नसुनहि, एक प्रकारचा आजच्या पिढिला अपेक्शीत असणारा प्रोफेशन्यालिझम.

सुरुवात सध्या सध्या गोष्टीनी होते जसे शरिरिक व्यायाम, थेएटर गेम, आपल्या शरिराचि निट ओळख करुन घेणे, त्याचा उपयोग रंगमंचावर हालचाल करताना समतोल राखणे त्याच बरोबर श्वासा वर नियंत्रण मिळवणे आणि वाचिक अभिनय. पुढे ते एक्सटेन्सिव्ह होत जाते, हा असं असलं तरि यात एक धमाल अहे.

नुसते कलाकर घडवणे हेच पी. डी. ए. उद्दिष्ट नसुन एक सुजाण आणि अभिजात असा प्रे़क्षक पण इथे  तयार होतो.

या वर्कशॉप नंतर तुमच्या व्यक्तिमत्वात कित्येक बदल घडतात, म्हणजे नाटक सिनेमा तर आहेच पण कित्येक जणांचि शारिरीक हलचाल (बॉडि लँग्वेज), बोलणं, स्ट्रेस मॅनेजमेंट, टिम वर्क असे झालेले बदल मि स्वतः पहिले अनुभवले आहेत.

शर्वरी शाह 

Workshop च्या पहिल्या दिवशी थोड़ी excitment, थोड़े tension, थोड़ी ख़ुशी, थोड़ी भीती.. अशा संमिश्र भावना होत्या. तिथल वातावरण कस असेल, माणस कशी असतील, सगळ्यांचा स्वाभाव कसा असेल,.. असे बरेचसे प्रश्न मनामध्ये गर्दी करून होते.. परंतु पहिल्याच दिवशी एकमेकांची एवढ्या चांगल्या प्रकारे ओळख झाली आणि आम्ही सगळे एकमेकांचे खुप चांगले मित्र-मैत्रिणी झालो. सगळे ताई आणि दादासुद्धा इतके happy go lucky आहेत, की ते ही आमचे छान friend झाले.

आम्हाला या workshop मध्ये खुप चांगल्या आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शन लाभले.

वेंगुर्लेकर काका यांनी  नाटकाबद्दल, कथेबद्दल, अभिनायाबद्दल खुप उपयोगी अशी माहिती दिली. आमच्या सर्वांकडून improvisations अतिशय उत्तम प्रकारे करुन घेतले. रुपाली ताई, अमृता, आशीष दादा, स्मिता ताई, यांनी काही games आणि काही activities घेतले. या games आणि activities मुले स्वतःवरचा विश्वास तर वाढलाच त्याचबरोबर दुस-यांवरचा विश्वास वाढला, team -work चे महत्व पटले.

किरण दादाने writting वर, direction वर खुप छानप्रकारे session घेतले, तर प्रसाद वनारसे यांनी set designing वर session घेतले. समर नखाते यांनी lights वर तर श्रीनिवास भणगे यांनी नाटक सादरीकरण आणि नाटकाचे संवाद यावर session घेतले. आनंद चाबुकस्वार आणि अतुल पेठे यांनी आमच्या काही activities, काही व्यायाम, काही आवाजाचे व्यायामही घेतले. गीतांजलि ताई आणि मेघना ताई यांनी आवाजावर, कल्याणी ताईने नाटकाचे costume यावर खुप छान session घेतले. गंधार संग्राम याने music वर session घेतले तर अनिरुद्ध दादाने अभिनेता कसा असतो, कसा असावा, अभिनय कसा असावा.. यावर छान छान टिप्स दिल्या. मंदर कुलकर्णी याने आमचे काही व्यायामाचे प्रकार घेतले, postures, focus इ. गोष्टींवर session घेतले.

शेवटच्या सहा दिवसात आम्ही theme वर कम करणार होतो. त्यासाठी आम्हाला चार group मध्ये  विभागले गेले. मी आशिष दादाच्या theme मध्ये होते. आमची theme खुप serious होती. महेश एलकुंचवार यांचे ‘रक्तपुष्प’ हे नाटक आम्ही करणार होतो.

यापूर्वी मी नाटक कधीच केले नसल्याने मला खुप tension आले होते. मला करता येइल का..? dialogues पाठ होतील का..? नाटक कसे होइल..? असे बरेच विचार मनामध्ये घालमेल करत होते. मग आमच्या improvisations ला सुरवात झाली.. आशिष दादाने अशाप्रकारे आमच्याकडून impro. करुन घेतले की त्या character ची आणि आमची उत्तम प्रकारे ओळख झाली. मी ‘लिली’ हे पात्र साकारले होते, आणि impro. केल्याने ‘लिली’ एखाद्या situation ला काय म्हणेल, कशी react होइल.. हे मी (शर्वरी) व्यवस्थितपणे सांगू शकत होते. so, त्यासाठी आशिष दादाला खुप खुप thank you. त्याने सगळे पात्र आमच्याकडून खुप चांगल्याप्रकारे करवून घेतले.

या workshop चे तिनिही आठवडयातील प्रत्येक दिवस, प्रत्येक session माझ्यासाठी best आणि अविस्मरणीय आहे. त्यातील बरेचसे best moments आहेत.. त्यापैकी १-२ share करते..

एक म्हणजे final day ला theme madhye माझ्या दोन प्रवेषानंतर माझ्या मनात stage बद्दल अजिबात भीती राहिलेली नव्हती.. तीस-या प्रवेशाला मी एकदम confident होते.. तो क्षण माझ्यासाठी best होता.

आणि दूसरा म्हणजे dairy लिहीण्यासाठी असणा-या ३ बक्षिसांपैकी एका बक्षिसासाठी रुपाली ताई ने माझे नाव पुकारले, तो क्षण.

Workshop संपले तरी नंतरचे ३-४ दिवस आपोआप ४.३० वाजता एकमेकांना msgs जायचे की.., ‘निघालीस का?’ or ‘निघालास का?’, ‘आज मी घरीच ५ वाजता व्यायाम केला..’ वगैरे वगैरे..

हे workshop attend केल्याने नाटकासाठी उपयोगी असणा-या खुप गोष्टी तर शिकले. परंतु, त्याचबरोबर जीवनामध्ये उपयोगी येणा-या काही अनमोल गोष्टीही शिकले. माझ्यामध्ये खुप चांगला आणि posivite बदल झाला, मी खुप confident झाले, आदी stage वर जायला देखिल घाबरायचे..आता बिनधास्त stage वर जाऊ शकते.. कोणतेही पात्र मी सहजतेने करू शकते.. असा confidence आला. पहिल्यापेक्षा खुप जास्त active झाले.. खुपच छान वाटले मला.. माझ्या आयुष्यातील छान अनुभवांपैकी हा एक अनुभव आहे.

All Thanks To PDA & All Team..!!

रसिका पटवर्धन 

मला ना खरं सांगायचं तर नाटकाची खूप आवड आहे पण एक होतं की मला हवा तसा platform मिळत न्हवता  त्यामुळे  मला कळत न्हवतं की काय करावं? Progressive Dramatic Association ची जाहिरात आली  आणि ती वाचल्यावर लगेचच phone लावला आणि सगळ्या अटी आणि नियम विचारून घेतल्या पण त्यानंतर इतका शिस्तीशिर वागणं आपल्याला जमणार का? अस मनात आलं पण….  आणि ठरवलं की नाही…workshop attend कराचच….

workshop attend करताना खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या आणि ताई दादा सुद्धा. जसजसा workshop पुढे सरकत होत तसतसं खूप शिकायला मिळत होत म्हणजे  एक चांगली व्यक्ती म्हणून पण आणि त्याचा नाटकात नक्की ऊपयोग होईल अस पण रुपाली ताई  ने, आशिष दादा ने खूप खेळ घेतले आणि त्यातून आपल्याला नाटकात काय काय जरुरी असत, म्हणजे आपण किती सावध असल पाहिजे प्रत्येक क्षणी,आपले कान, नाक ,डोळे सतत उघडे ठेऊन सतत काहितरी  नवीन आणि चांगल पाहायला पाहिजे,प्रत्येक वेळी काहितरी   चांगलं अनुभवायला पाहिजे,

workshop मध्ये guest lectures पण होती.त्यात अतुल पेठे.श्रीनिवास भणगे,समर नखाते,गंधार संगोराम,आनंद चाबुकस्वार आणि अनेक जाणं आली होती.प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या विषयांवर माहिती देत होते म्हणजे कोणी light वर तर कोणी music वर,कोणी stage विषयी तर कोणी costume विषयी कोणी script   कशी लिहावी याविषयी… आणि आनंद दादा ने तर नाटक पूर्वीपासून काय सांगत आलाय नाटक म्हणजे नक्की काय हे संगीताला.नंतर नंतर आणखीन interest वाढत गेला.कारण आम्ही सगळे त्या नाटकाच्या दृष्टीने विचार करायला लागलो होतो.शिबिरामध्ये काही vidio clips पण दाखविण्यात आल्या.जेणेकरून आम्हाला जगात नाटक काय आहे! हे कळू शकेल….सत्यशोधक नावच एक अप्रतिम नाटक पण आम्ही सर्वांनी बघितलं,वोर्क्शोप मध्ये आम्ही सगळ्यांनी improvisations पण केली त्यात आम्हाला प्रत्येकाला स्वतःची capacity कळायची की,आपण खरच नाटक करू शकतो का?

पी डी एं खरच खूप एक चांगली संस्था आहे जिथे “नाटक” करायचा खरा अनुभव मिळतो. आणि खर “नाटक” शिकवलं जातं  शेवटच्या दिवशी आमच्या सर्वांचे groups पाडून आम्ही प्रत्येकाने एक शोटासा अभिनय केला.माझ्या नाटकाची director रुपाली ताई होती. नाटक बसवताना तिने जे जे काही सांगितले ते नाटक करताना खूप उपयोगी पडले आणि पुढे पडेल, कारण नाटक करताना ती ज्या छोट्या छोट्या tips सांगत होती म्हणजे तू आता असं केलंस ना असं नको करू असं कर,तसा करून बघ…  त्या tips खूप उपयोगी पडल्या.

 (या workshop ने  माझ्यात एक positive attitude आला आणि mainly पहिल्यापेक्षा confidence वाढला… )   

आता असंच नाटक करत करत “नाटक” खूप अनुभवायचं आहे………